價格:免費
更新日期:2019-06-25
檔案大小:17M
目前版本:3.0
版本需求:Android 4.3 以上版本
官方網站:mailto:krushisarthi@gmail.com
पिकावर येणाया अनेक प्रकारच्या किडी आणि त्यापासून होणाया नुकसानीची जाणीव सर्वांना आहेच. किडीचे नियंत्रण करायचे झाल्यास रासायनिक किटकनाशकाचा वापर या एकाच बाबीचा विचार केला जातो. किडींचे नियंत्रण केवळ रासायनिक किटकनाशकाचा वापर करून यशस्वीरित्या होत नाही. किडींचे नियंत्रण करणे म्हणजे त्यांचा समुळ नायनाट करणे असे नव्हे. त्यामुळे या किडींचे समुळ उच्चाटन करण्याचा विचार सोडून देऊन “जगा व जगू द्या” या उक्तीप्रमाणे त्यांचे व्यवस्थापन विविध पध्दतीचा वापर करून केला पाहिजे. एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे एकमेकास पूरक अशा सर्व तंत्रज्ञानाचा वापर करुन किडीची संख्या कमी करणे जेणेकरुन ती आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली असेल. एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे मशागतीय, यांत्रिक, जैविक व रासायनिक या पध्दतीचा अवलंब करुन किडीचे व्यवस्थापन करणे, जेणेकरुन आर्थिक, आरोग्य व पर्यावरणीय धोके कमी होतील.